आदित्यसारखा डॅशिंग नेता हवा, संजय दत्तचा पाठिंबा

1305

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासारख्या डॅशिंग युवा नेत्याची आज देशाला गरज आहे असे सांगत बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय दत्त याने ‘ट्विटर’वर आज एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर मोठे उपकार आहेत. ते मी कधीही विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुखांसारख्या महान नेत्याचा वारसा आदित्य ठाकरे यांना लाभला आहे. आदित्य मला लहान भावासारखा आहेत. माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांचे राजकारणातील पदार्पण जनतेसाठी निश्चितच लाभदायक ठरेल. आपल्या देशाला आदित्य यांच्यासारख्या अनेक तरुण, तडफदार नेत्यांची गरज आहे’ असे संजय दत्तने या व्हिडीओत म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांना मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा लाभत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच बॉलीवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या