संजय निरुपम यांची पक्ष सोडण्याची धमकी

4511

जागावाटपावरून नाराज झालेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडाचा झेंडा घेतला असून काँग्रेस उमेदवाराच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय निरुपम यांनी घेतला आहे. तसेच पक्ष सोडण्याचीही ट्विटरद्वारे धमकी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील मुंबईतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून निरुपम काँग्रेसवर नाराजच होते. ट्विटबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबईत विधानसभेच्या 36 जागांपेकी वर्सोवा येथील एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची शिफारस मी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसमधील चार नेत्यांना केली होती. काँग्रेसचा इतर जागांवर पराभव होण्याची शक्यता आहे, पण वर्सोव्यातील जागेवर उमेदवार निवडून आणतो अशी ग्वाही मी काँग्रेसच्या नेत्यांना दिली होती. पण तरीही मी शिफारस केलेल्या कार्यकर्त्याच्या नावाचा तिकीट वाटपात विचार केला नाही. याचा अर्थ काँग्रेसला माझी गरज नाही, माझा सन्मान राखला जात नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या