
जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निकालांवर X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत की, “जर एकनाथ शिंदे शिवसेनेचे जयचंद झाले तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता. मराठी लोक शिंदेंना जयचंद म्हणून लक्षात ठेवतील.”






























































