
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळून 120 जागा जिंकतोय, लोकं तीन तीन तास वणवण करून ठाकरे ब्रँडला मतदान करतायत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर ठाकरेंचाच महापौर होणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांचा गोंधळ, पुसली जाणारी शाई अशा विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.






























































