दे धडक बेधडक! संजय राऊत भीमा पाटस कारखान्यात दाखल, पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा पाटस कारखान्याला भेट देण्यासाठी जात असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी अडवले आहे. कारखान्यात एनओसीशिवाय जाता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. आपण खासदार असून आपल्याला कोणीही कायद्यानुसार अडवू शकत नाही, तसे केल्यास तुमच्यावर हक्कभंग होईल, असे राऊत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना समजावले. तसेच आम्ही काही अयोग्य करत असल्यास घटनेचे उल्लंघन करत असल्यास तुम्ही आम्हाला रोखा. आम्ही फक्त आता जाऊन भेट देऊन येणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कारखान्याकडून आम्हाला एनओसीशिवाय कोणालाही आत सोडू नये, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर व्यक्तींसाठी एनओसीची गरज असते. मात्र, खासदारासाठी अशा एनओसीची गरज नसते, असे राऊत यांनी सांगितले. कारखाना तुम्हाला आदेश कसे देतात, तुम्ही सरकारी नोकर आहात, असेही राऊत यांनी सांगितले.