रवींद्रन लुंगीवाले यांचे छातीवर कमळ लावून मतदान, निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? संजय राऊत यांचा संताप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मतदान करताना शर्टाला कमळाचे चिन्ह लावले होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

”निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात, काढा यांना ठेचून”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.