
सामना ऑनलाईन । मुंबई
4 जानेवारी 2015 साली पहिल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर चार वर्षांच्या कालावधीत 99 मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा संकेत गणेश बट्टू आता 100 व्या मॅरेथॉन शर्यतीसाठी सज्ज झालाय. येत्या 24 मार्च रोजी कल्याण-डोंबिवली मॅरेथॉनमध्ये तो आपली ‘शंभरी’ पूर्ण करणार आहे.
18 वर्षीय संकेत बट्टू याने शालेय स्तरावर चमकदार कामगिरी करीत आपला ठसा उमटवलाय. यावेळी त्याने जिल्हा व राज्यस्तरावरही शानदार प्रदर्शन केले आहे हे विशेष. दादर येथील मुंबई आंध्र महासभा जिमखाना यांचे त्याला सहकार्य लाभलेय. तो चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
गोव्यात दमदार कामगिरी करीत आयर्नमॅनसाठी पात्र ठरणाऱ्या संकेतचे वडील पोलीस कॉन्स्टेबल आहेत. आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून देशाचा झेंडा दिमाखात फडकवायचाय. हेच ध्येय त्याने उराशी बाळगलेय.

























































