संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यास रथ अर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 श्री भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी आणि पुन्हा पंढरपूर या पालखी सोहळ्याकरिता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे संस्थानला जर्मन सिल्व्हर रथ अर्पण करण्यात आला आहे.

हा रथ संस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते भंडीशेगाव येथे भेट देण्यात आला. या प्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज केशव नामदास, एकनाथ नामदास,  निवृत्ती नामदास, मुकुंद नामदास, नामदास कुटुंबीय, पालखी सोहळ्याचे जनक हैबतबाबा आरफळकर यांचे प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर,  आळंदी संस्थांचे व्यवस्थापक माउली वीर,  दिंडी प्रमुख राणू महाराज वासकर, माऊली जळगावकर, गणेश कराडकर,  देवीदास ढवळीकर,  बाळासाहेब उखळीकर,  हरिभाऊ बोराटे आजरेकर आदींसह दिंडीकरी, फडकरी,  वारकरी उपस्थित होते.

 दरम्यान सोहळ्यात पहाटे भंडीशेगांव मुक्कामी माऊलींच्या वैभवी पादुकांची विधीवत पूजा प्रमुख विश्वस्त सरपंच योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. सोहळ्यातील प्रवासात दिवसभर माऊलींच्या दर्शनास पंचक्रोशीतील तसेच सोहळ्यातील भाविकांनी गर्दी केली.