
डायसप्लॉट भागात दहशत निर्माण करण्यासाठी तरूणावर हल्ला करणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केले आहे. त्याचबरोबर आरोपींच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय कांबळे आणि सागर मावस (रा. गुलटेकडी )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्वारगेट परिसरात 23 मे ला तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. त्यावेळी तरूणावर वार करणाऱ्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अक्षय आणि सागर यांच्यासह दोन अल्पवयींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, विजय कुंभार, विजय खोमणे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, वैभव शीतकाल, लखन ढावरे, शंकर गायकवाड, ऋषि तिटमे, यांच्या पथकाने केली.


























































