
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, शहरप्रमुख सुनील सुरवसे, सखाराम देवकर, हनुमान पांडे, कल्याण कवचट, लक्ष्मण ठाकूर, अजीनाथ भांडवले, चंद्रकांत ठोंबरे, राहुर फरताळे, सुहास उगले, बंडू गोडसे आदींनी सहभाग घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.


























































