टीका करा, पण शिव्या देऊ नका; ट्रोलर्समुळे सरफराज आला रडकुंडीला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानचा संघ ट्रोल होत आहे. टोलर्समुळे पाकिस्तानी संघाचा कर्णधार सरफराज अहमद रडकुंडीला आला आहे. टीका करा, परंतु अपशब्दांचा वापर करू नका, असे आवाहन त्याने टीकाकारांना केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीकाकारांबाबत बोलताना सरफराज म्हणाला, मी यावर जास्त काही बोलणार नाही. टीकाकारांना थांबवणे आमच्या हातात नाही. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे आणि आमचा पहिला संघ नाही जो पराभूत झाला आहे. गेल्या वर्ल्डकपमध्येही प्रत्येक संघाने पराभव पाहिला आहे. आमच्यासारखी टीका आधीच्या संघांनी झेलली असती तर त्यांना याचे दु:ख समजले असते. यावेळी सरफराजने टीकाकारांनी अपशब्दांचा वापर करू नका असे आवाहन केले.