पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदची हकालपट्टी

1156

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकमधील चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद यांच्या मैदानातील जांभयांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला जबरदस्त ट्रोल केले होते. वर्ल्ड कपपासूनच सरफराजच्या कर्णधारपदावर टांगती तलवार होती. अखेर श्रीलकेंच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर ही तलवार त्याच्यावर कोसळली आहे.

श्रीलंकेकडून कसोटी व टी-20 सामन्यांत झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचलबांगडी केली आहे. सरफराजच्या जागी अझर अली याला कसोटी सामन्यांसाठी तर बाबर आझम याला टी-20 सामन्यासाठी कर्णधार पद देण्यात आले आहे. यासोबतच सरफराजला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातही स्थान देण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या