कणकवली तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कणकवली तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 2020 ते 2025 या कालावधीसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. तालुक्यातील 63 पैकी 31 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 5 ग्रामपंचायती राखीव असून त्यातील 2 महिलांसाठी , अनुसूचित जमातीसाठी 1 असून ती महिलांसाठी , नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायती असून त्यातील 8 महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील 40 पैकी 20 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीवेळी तहसीलदार आर.जे.पवार, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील,गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत झाली.हार्दिक भावेश कऱ्हाळे या बालकांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती 5 जागा- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तरंदळे , कसवण तळवडे व जानवली तर अनुसूचित जाती महिलांसाठी ओटव व नागवे या 2 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

अनुसूचित जमातीसाठी एक- ती महिलांसाठी तालुक्यातून अनुसूचित जमाती महिलांसाठी हळवल ही ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 17 जागा- यातील 8 महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागांमध्ये नांदगाव , पियाळी , डामरे , गांधीनगर , कळसुली , कोळोशी , करंगवणे – बेर्ले , असलदे , शिवडाव यांचा समावेश आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी- दारूम , भिरवंडे , करूळ , कुंभवडे , पिसेकामते , सातरल , शेर्पे व वायंगणी यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 यातील 20 महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण- सर्वसाधारण प्रवर्ग लोरे , बेळणेखुर्द , भरणी , चिंचवली , दिगवळे , घोणसरी , आशिये , हरकुळ खुर्द , कोंडये , नाटळ , साकेडी , साळीस्ते , शिडवणे , तळेरे , तिवरे , हरकुळ बुद्रुक , वागदे , कलमठ , सांगवे व नरडवे . सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी- माईण , वारंगाव , कासार्डे , वाघेरी , आयनल , दारिस्ते , ओझरम , सावडाव , नडगिवे , तोंडवली – बावशी , वरवडे , बोर्डवे , हुंबरठ , बिडवाडी , कासरल , खारेपाटण , शिरवल , फोंडाघाट , ओसरगांव व करंजे असे आरक्षण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या