मालवणातील सरपंच आरक्षण निश्चित; 65 पैकी 32 ग्रामपंचायतींवर महिलाराज

मालवण तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 6 ग्रामपंचायतींसह एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. 65 पैकी 5 ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी, 1 ग्रामपंचायत अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली. 18 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) तर 41 ग्रामपंचायत खुल्या (ओपन) स्वरूपात आरक्षित करण्यात आल्या. 65 पैकी 32 ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण निश्चित झाले आहे.

तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली मामा वरेरकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या या आरक्षण सोडतीत निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, आर. पी. मोंडकर, दिनेश सावंत, अरुण वनमाने, नवीन तांबे यासह अन्य महसूल कर्मचारी उपस्थित होते. भंडारी हायस्कुल येथील सम्राट राजे या विद्यार्थ्यांने बरणीतून चिठ्या उचलून आरक्षण निश्चितीत भूमिका बजावली. यावेळी तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अनुसूचित जाती-जमाती आरक्षण

अनुसूचित जाती सर्वसाधारण : चौके, बांदिवडे खुर्द, वायंगणी तर अनुसूचित जाती (महिला) : नांदोस, काळसे असे एकूण पाच ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. तर तालुक्यात पहिल्यांदाच एकमेव स्वरूपात अनुसूचित जमातीसाठी सुकळवाड गावचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. लोकसंख्येचा विचार करून व मागील दोन टर्मच्या आरक्षण निश्चितीवरून नवे आरक्षण निश्चित करण्यात आले.

मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण

18 ग्रामपंचायत सरपंच नागरिकांचा मागास प्रवर्ग निश्चित करण्यात आले. त्यापैकी कातावड, ओवळीये, मर्डे, वडाचापाट, तोंडवळी, किर्लोस, चाफेखोल, श्रावण, आनंदव्हाळ या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव. तर चिंदर, देवली, आडवली-मालडी, गुरामवाड, पळसंब, आंबेरी, असरोंडी, बुधवळे-कुडोपी, साळेल या 9 ग्रामपंचायत ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आहे.

खुले (ओपन) आरक्षण

मालवण तालुक्यातील 65 पैकी 41 ग्रामपंचायत ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण निश्चित झाले. त्यापैकी माळगाव, वायंगवडे, धामापूर, कोळंब, वराड, हेदुळ, मालोड, मसदे-चुनवरे, गोठणे, बिळवस, तिरवडे, शिरवंडे, घुमडे, तळगाव, असगणी, पेंडूर-खरारे, तारकर्ली-काळेथर, कुंभारमाठ, आमडोस, सर्जेकोट-मिर्याबांदा, राठीवडे या 21 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण. तर कांदळगाव, कुणकावळे, देऊळवाडा, नांदरुख, गोळवंण, हडी, महान, देवबाग, निरोम, हिवाळे, पोईप, आचरा, वायरी, खोटले, बांदिवडे बुद्रुक, त्रिंबक, मठ बुद्रुक, रेवंडी, रामगड, वेरळ या 20 ठिकाणी खुले सर्वसाधारण असे आरक्षण असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या