
सातारा जिह्यात अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिह्यात 542 गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसवला जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिह्यात तब्बल 1 हजार 583 जणांवर प्रतिबंधात्मक व तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आगमन व विसर्जन मिरकणुकांमध्ये ड्रोनचीही भिरकीट राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सातारा पोलीस दल अलर्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तात्पुरती तडीपारी क प्रतिबंधात्मक कारवाईचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत 1 हजार 465 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच 103 संशयित आरोपींना गणेशोत्सव कालावधीकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायद्यान्वये तात्पुरते तडीपार करण्यात आलेले आहे.
सातारा जिल्हय़ात पोलीस दलाच्या वतीने सातारा शहर, कराड शहर, फलटण, वाई, या प्रमुख शहरांसह संपूर्ण जिह्यामध्ये दंगा काबू योजना, रंगीत तालीम व रूट मार्च कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आलेले आहेत. सातारा शहरासह जिह्यात ध्वनिप्रदूषण कायद्याखाली दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करणार आहेत.
3100 पोलिसांचा फौजफाटा तैनात
n गणपती तसेच ईद-ए-मिलाद या सणांसाठी जिह्यात 1 पोलीस अधीक्षक, 1 अपर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक व 140 पोलीस अधिकारी, 1840 पोलीस अंमलदार, 1 एसआरपीएफ कंपनी, 3 आरसीपी पथक, 1 क्यूआरटी पथक, 1100 गृहरक्षक असे मनुष्यबळ बंदोबस्तासाठी असणार आहे. जिह्यामध्ये निघणाऱया मिरकणुका व इतर कार्यक्रमांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱयासह 7 ड्रोन कॅमेऱयांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.