खटावमध्ये पाच वाळूतस्करांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खटाव तालुक्यातील कोकराळे येथे ट्रक्टरमधून अवैधरीत्या वाळूवाहतूक करणाऱया पाचजणांना औंध पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तीन ट्रॅक्टर आणि वाळूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किशोर प्रल्हाद कदम (वय 48), दीपक शंकर शिंदे (वय 33), अनिल बापू कांबळे (वय 31), रजनीकांत शंकर शिंदे (वय 31), अक्षय बाळू कांबळे (वय 30, सर्व रा. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मायणीनजीकच्या येरळा नदीपात्रातून तीन ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळूउपसा करून तो कोकराळे येथील घराच्या बांधकामासाठी नेत असल्याची माहिती औंधचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह कोकराळे येथे सापळा रचून  आरोपींनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन ट्रक्टर, दोन दुचाकी, तीन ब्रास वाळू, असा 12 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.