Video- प्रजासत्ताक दिनी अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

10

सामना ऑनलाईन । सातारा

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणावेळी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. आपल्यावर अन्याय होत असताना पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ही महिला जांब येथील रहिवासी असून गावातील एक व्यक्ती सतत त्रास देतो मात्र अनेकवेळा तक्रारी देऊनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या