कर्नाटकने ऑक्सिजन पुरवठा रोखणे दुर्दैवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्याऑक्सिजनच्या साठयापैकी कर्नाटक येथील बेल्लारीतून येणारा 50 मेट्रिक टनचा साठा अडविला गेल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रव कोकणातील इतर जिह्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला.

या बाबीकडे लक्ष वेधून कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे गृह व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यात हस्तक्षेप करत जीवितहानी होवू नये यासाठी हा पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने राजकारणापलीकडे जावून या गोष्टीत लक्ष घालावे आणि कोविड-10च्या या महामारीशी लढत असलेल्या सर्वसामान्यांचे जीव वाचविण्याच्या एकमेव उद्दिष्टाने एकत्रितपणे लढावे, अशी विनंतीही पाटील यांनी केली आहे.

“दुर्दैवाने 50 मेट्रिक टनाचा केंद्राने केलेला पुरवठा कर्नाटक राज्याकडून रोखला गेल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिह्यांमध्ये तुटवडा निर्माण होणार आहे,’’ असे ट्वीट पाटील यांनी केले आहे.