
सौदी अरेबिया आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे आयपीएलचे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले. मात्र याविषयी अद्याप अधिकृत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच धुमाळ यांनी 2028मध्ये आयपीएल सामन्यांची संख्या वाढवण्याविषयी माहिती दिली. तसेच संघांच्या संख्येविषयीही ते विचार करणार असल्याचे सांगितले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सौदी येथील जेद्दा शहरात आयपीएलच्या 18व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला.