द्वादश ज्योतिर्लिंगाची आराधना करण्यासाठीचे विशेष स्तोत्र

चार्तुमासात भगवान शंकराची पूजा विशेष मानली जाते. देशातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन, पूजन याचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिर्लिंगाचे पूजन करण्यासाठी द्वादश ज्योतिर्लिंगाचे स्त्रोत्र गायले जाते. आपण देखील हे स्त्रोत्र पठण करू शकतो. हे स्तोत्र पठण करण्यास अगदी सोपे आहे.

द्वादश ज्योतिर्लिंग ही केवळ पवित्र स्थानं आहेत असे नाही तर ते शक्तीचे स्त्रोत आहेत. भक्तांच्या प्रचंड पराक्रमावर प्रसन्न होऊन, तसेच राक्षसांचा विनाश करण्यासाठी भगवत् तत्त्व पृथ्वीवर लिंग रुपात स्थीर झाले ती ही ठिकाणं आहेत. त्यामुळे ही ठिकाणं मोठी उर्जा देतात. भक्ती आणि शक्तीचा संगम इथे पाहायला मिळतो.

हे स्तोत्र पठण दररोज केल्यानं मन शुद्ध, पवित्र होतं आणि सत्कार्यासाठी प्रेरणा देतं.

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

आपली प्रतिक्रिया द्या