‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची महारॅली

739

खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी सुरू असलेल्या “सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ मोहिमेंतर्गत रविवारी महारॅलीचे आयोजन करण्यात आले. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या 10 हजारांपेक्षा जास्त पालक या महारॅलीत सहभागी झाले होते. यशवंत स्टेडीयम येथून निघालेल्या मोर्चाचा समारोप कस्तुरचंद पार्क येथे झाला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

राज्य सरकारचे मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण यामुळे राज्यात आरक्षणाचा टक्का 74 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून नोकऱ्यांमध्येही खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळावा, यासाठी “सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’द्वारे संविधान चौकात सोमवार, 19 ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. शनिवार, 24 ऑगस्टपर्यंत हे उपोषण सुरू होते. त्यानंतर, 25 ऑगस्ट रोजी पालक आणि विद्यार्थी यांची महारॅली काढण्यात आली. यशवंत स्टेडियमपासून प्रारंभ झालेल्या रॅलीचा कस्तूरचंद पार्क येथे समारोप झाला. आंदोलन समन्वय समितीचे डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनिल लद्दड यांच्या नेतृत्वात महारॅली निघाली.

आपली प्रतिक्रिया द्या