
सामना ऑनलाईन । मुंबई
‘कोण होणार करोडपती’हा नागराज मंजुळेचा सूत्रसंचालक म्हणून पहिला कार्यक्रम आहे. प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. त्यातच कोण होणार करोडपतीच्या सेट्सवर एक खास पाहुणे दिसले, ते म्हणजे सयाजी शिंदे. सयाजी शिंदे फक्त सेटवर भेट द्यायला आले होते की कार्यक्रमात सहभागी व्हायला, याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. येत्या 27 मेपासून ‘कोण होणार करोडपती’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना बघता येईल. सयाजी शिंदे नेमके कशासाठी आले होते, ते तेव्हाच प्रेक्षकांना समजेल.




























































