एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवला

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जमध्ये वाढ केली आहे. आता फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर दुसऱया बँकेच्या एटीएममधून कॅश काढणे आणि बॅलन्स चेक करणे आधीच्या तुलनेत महाग करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार, एटीएममधून कॅश काढल्यानंतर प्रति ट्रान्झॅक्शन 23 रुपये आणि बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट यासारख्या नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर 11 रुपये जीएसटीसह चार्ज द्यावा लागणार आहे. याआधी कॅश काढल्यानंतर 21 रुपये चार्ज होता. तो आता वाढून 23 रुपये करण्यात आला आहे. एसबीआय खातेधारकांना प्रत्येक महिन्याला केवळ पाच ट्रान्झॅक्शन फ्री मिळतील. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 23 रुपये द्यावे लागतील. बॅलन्स चेक करण्यासाठी 11 रुपये द्यावे लागतील.