
भारतीय स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदरात कपात करून ठेवीदारांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने ठेवीदर 0.15 टक्क्याने कमी केला असून दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवर नवे व्याजदर 10 जानेवारीपासून लागू करण्यात येतील असेही बँकेने स्पष्ट केले आहे. एसबीआयच्या संकेतस्थळावर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
असे असतील व्याजदर
1 ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर बँकेने कमी केला आहे.
एक वर्षाहून अधिक मुदतीच्या ठेवीसाठी आता 6.10 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी तो 6.75 टक्के होता.
नव्या व्याजदर कपातीने सर्वसामान्य ठेवीदारांच्या व्याजावरील उत्पन्नात घट होईल.




























































