
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आपल्या नजरेने घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काही क्षणांत या व्हिडीओला लाखो हिट्स मिळून शेकोडोंनी हा व्हिडीओ शेअर केला होता. पण या व्हिडीओमुळे काहींच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांनाच फटकारात ‘तुम्हाला काही काम धंदे नाहीत का?’ असा प्रश्न विचारला.
१३ फेब्रुवारी रोजी प्रियाच्या ‘ओरू अदार लव’ या मल्ल्याळम चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले होते, त्यात प्रिया नायकाला डोळा मारताना दिसत आहे. पण हैदाराबादमधील मुकीत खान आणि जहिरुद्दीन अली खान यांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत पोलिसांत धाव घेतली. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे गाणे ज्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे, त्यावर त्यांना आक्षेप आहे, या गाण्यावर बंदी आणून प्रियासह चित्रपटाशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती. तसेच अशा प्रकारे डोळे मारणार्यावर इस्लाममध्ये बंदी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
प्रिया वॉरियरचे हे बोल्ड फोटो बघितलेत का?

























































