
लॉकडाऊनदरम्यान चित्रपट, मालिकांचे शूटिंग बंद असल्याने मनोरंजनाची धुरा खऱया अर्थाने सांभाळली ती वेबसिरीजने. अशाच गेल्या वर्षभरात हिंदुस्थानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय वेबसिरीजची यादी आयएमडीबीने जाहीर केली आहे. यात सोनी लिव्हवरील ‘स्कॅम 1992’ या वेबसिरीजने बाजी मारली असून 10 पैकी 9.5 गुण मिळवले आहेत. दुसऱया क्रमांकावर अॅमेझॉन प्राईमची ’पंचायत’ तर तिसऱ्या क्रमांकावर हॉटस्टारची ‘स्पेशल ऑप्स’ ही सिरीज आहे.
इंटरनेट मुव्ही डेटाबेस अर्थात ‘आयएमडीबी’ हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यात प्रेक्षक टीव्ही शो, चित्रपट किंवा वेबसिरीज पाहून त्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. सर्वसाधारणपणे आयएमडीबीवर प्रेक्षकच 10 गुणांनुसार आकडेवारी देतात. त्याच यंदाच्या वर्षी ‘स्कम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारित आहे. अवघे 40 रुपये घेऊन मुंबईत आलेला हर्षद बीएसईचा बादशहा कसा होतो आणि त्यानंतर सर्वात मोठा घोटाळा करणारा खलनायक कसा होतो हे यात पाहायला मिळते.
‘आयएमडीबी’ची लोकप्रिय वेबसीरिजची यादी जाहीर
टॉप 10
- स्कॅम 1992
- पंचायत
- स्पेशल ऑप्स
- बंदिश बॅण्डिट्स
- मिर्झापूर
- असूर
- पाताल लोक
- हाय
- अभय
- आर्या



























































