शिक्षक समितीतर्फे 6 फेब्रुवारीला जिल्हास्तर मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गतर्फे जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा बुधवारी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जि.प. शिक्षण समितीच्या मान्यतेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) या परीक्षा देणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ही सराव परीक्षा केंद्रबल गट किंवा प्रभाग निहाय सकाळी 11 पासून आयोजित केली आहे.

या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा पातळीवर गौरविण्यात येणार आहे. संघटनेने नियोजित सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक नेमले असून परीक्षा झाल्यावर लगेच उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात येणार आहे. सराव परीक्षेस जिल्हाभरातून सुमारे 3 हजार विद्यार्थी बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले आहे.