धक्कादायक…. बर्मिंगहॅम येथील मैदानात शाळकरी मुलीवर बलात्कार; आरोपीला 3 वर्षे 7 महिने कारावासाची शिक्षा

मानवतेला काळिमा फासणारी घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर हल्ला करून एका 20 वर्षांच्या तरुणाने तिच्यावर अमानूषपणे बलात्कार केला. या घटनेचा पीडितेच्या मनावर परिणाम झाला आहे. ती घराबाहेर पडायलाही घाबरत आहे. या घटनेत सर्व पैलूंचा विचार करत न्यायालयाने 20 वर्षांच्या तरुणाला 3 वर्षे 7 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पालक आपल्या छोट्या मुलींना मैदानावर खेळायला पाठवायला घाबरतील अशी घटना लंडन येथील बर्मिंगहॅम मैदानात घडली आहे. एका तरुणाने 11 वर्षांच्या शाळकरी मुलीवर मैदानातच बलात्कार केला. केरील डेनहॅम या 20 वर्षांच्या तरुणाने या शाळकरी मुलीवर हल्ला करून तिच्यावर बलात्कार केला. दोन वर्षांनतर केरीलला न्यायालयाने या अक्षम्य गुन्ह्यासाठी ३ वर्षे ७ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

या घटनेचा त्या छोट्या मुलीच्या मनावर सखोल परिणाम झाला असून तिला घराबाहेर पडण्याचीही भीती वाटते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीश अविक मुखर्जी म्हणाले की ही घटना इतकी पाशवी आहे की या नराधमाने स्वत:ची लैंगिक वासना शमविताना या छोट्याशा मुलीचे वयही लक्षात घेतले नाही. बचाव पक्षाकडून सांगण्यात आले की केरीलला ऑटिझम, अटेंशन-डेफिसिटी आणि हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) हा मानसीक आजार असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याला बर्मिंगहॅमपासून दूर जाऊन एक नवीन जीवन सुरु करायचे आहे. मात्र, घडलेल्या घटनेची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष याच्या आधारे आरोपी तरुणाला 3 वर्षे 7 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.