
तुमच्या-आमच्यासाठी 5 ऑगस्टचा दिवस भलेही नेहमीसारखा असेल, पण खगोल शास्त्रज्ञांसाठी हा दिवस ऐतिहासिक आणि चकीत करणारा होता. कारण, आज पृथ्वीने तिच्या अक्षाभोवतीचा फेरा सुमारे 1.34 मिलिसेकंद लवकर पूर्ण केला. त्यामुळे आजच्या दिवसाची नोंद आतापर्यंतचा सर्वात लहान दिवस अशी होण्याची शक्यता आहे. 1.34 मिलिसेकंद हा वेळ इतका कमी आहे की, सर्वसामान्यांना त्याची जाणीवही होणार नाही. त्यामुळे कुणाच्याही रुटीनमध्ये कुठलाही फरक पडला नाही. परंतु खगोल संशोधकांनी हा बदल खूप गांभीर्याने घेतला आहे.