
ज्येष्ठ, दिव्यांग लाभार्थ्यांना आता दुसरा डोस नोंदणीशिवाय थेट केंद्रावर जाऊन घेता येणार आहे. यामध्ये 60 वर्षे व अधिक वयोगटातील सर्व लाभार्थी, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आणि चालता-उभे राहता न येणाऱया दिव्यांगांसाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस केंद्रांवर 100 टक्के लसीकरण कोविन अॅपवर नोंदणीनेच केले जाणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज ही नवी नियमावली जाहीर केली.
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षांवरील नागरिक, 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱयांना लसीकरण सुरू केल्यानंतर 1 मेपासून 18 वर्षांवरील वयोगटासाठीही लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारच्या 39 आणि 73 खासगी केंद्रांवर लसीकरण सुरुवात करण्यात आले होते.
मात्र सद्यस्थितीत पुरेसे डोस मिळत नसल्याने बहुतांशी खासगी केंद्रे बंद करण्यात आली. त्यामुळे उपलब्ध केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त चहल यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र
पालिकेच्या सर्व 227 वॉर्डमध्ये कमीत कमी प्रत्येकी एक या प्रमाणे मुंबईत 227 लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यानुसार मिळणाया डोसनुसार नियोजन करून सुरळीतरीत्या लसीकरण करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्तांनी असे दिले निर्देश
- केंद्रावर उपलब्ध डोसचा आढावा घेऊनच पेंद्राची वेळ निश्चित करावी. उपलब्ध डोस, लाभार्थ्यांच्या संख्येनुसार बूथची संख्या निर्धारित करावी
- लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळाचा पूर्ण वापर होण्यासाठी पेंद्रावर प्रतिदिन व प्रतिबूथ किमान 100 डोस उपलब्ध करून घ्यावेत.
- सोमवारपासून तीन दिवस थेट लसीकरण मोहीम सुरू होईल. रविवारी लसीकरण कार्यक्रम बंद राहणार असून पुरेसे डोस उपलब्ध होईपर्यंत अशा प्रकारे लसीकरण केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.






























































