एसटीने पत्रकारांना ‘जागा’ दाखवली! नव्या गाडय़ांमध्ये पत्रकारांसाठीची राखीव सीट शेवटच्या रांगेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बापू सुळे

जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणाऱया पत्रकारांना एसटी महामंडळाने ’जागा’ दाखवली आहे. एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी एक सीट राखीव ठेकली जाते. ती आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायची. मात्र आता महामंडळाने सुमारे 2700 नव्या गाडय़ांच्या बांधणीचे काम हाती घेतले असून त्यामध्ये पत्रकारांसाठीची सीट शेवटून दुसऱया रांगेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटीच्या लेखी पत्रकार बॅकबेंचर असल्याचेच अधोरेखित होत आहे.

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीला सात सहा दशकांहून अधिक काळाचा इतिहास आहे. शहरापासून गाव खेडय़ापर्यंत धावणाऱया एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, किधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पत्रकार, महिला, दिव्यांग, एसटी कर्मचारी अशा विविध घटकांसाठी गाडीत राखीव सीट असते. आतापर्यंत एसटीमध्ये पत्रकारांसाठी राखीव सीट चौथ्या-पाचव्या रांगेत ठेकली जात होती. मात्र महामंडळाने नव्या 42 सीटच्या गाडय़ांमध्ये पत्रकारांनी गाडीतील शेवटून दुसऱया रांगेत म्हणजे 30 नंबरची सीट राखीव ठेवली आहे. यावरून एसटी महामंडळाचा पत्रकारांप्रति असलेला दृष्टिकोन दिसून येत आहे.

एसटी कर्मचारीही मागेच
एसटीने पत्रकारांबरोबरच आपल्या कर्मचाऱयांसाठी असलेली राखीव सीटही मागे टाकली आहे. कर्मचाऱयांची सीट आतापर्यंत गाडीच्या मध्यभागी ठेवली जात होती. ती आता शेवटच्या रांगेत ठेवली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये नाराजी आहे. ज्या एसटीसाठी दिवसरात्र काम करतो, त्या गाडीमध्येही सन्मान मिळत नसल्याची खंत एका कर्मचाऱयाने क्यक्त केली.