
व्हॉट्सअॅपसाठी यूजर्सची सुरक्षा आणखी मजबूत व्हावी यासाठी मेटाने आयपी प्रोटेक्ट फीचर आणले आहे. याचा वापर करून व्हॉट्सअॅप अधिक सुरक्षित करता येईल. हे फीचर अपडेट करताना व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर तीन डॉट असलेल्या आयकॉनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर सेटिंग पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्रायव्हसी सेक्शनवर क्लिक करावे लागेल. शेवटी कॉलमध्ये प्रोटेक्ट आयपी अॅड्रेसवर टॅप करून तो ऑक्टिव्ह करावा लागेल. या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर कॉल करताना तुमचा आयपी अॅड्रेस सुरक्षित राहील.

























































