
सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याने दहशतवादी हल्ला झाल्याचे जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच जम्मू आणि कश्मीरमध्ये पाकिस्तानमुळे अस्थिरता निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त करतानाच दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. उद्या काय होईल, हे आम्हाला माहीत नाही. आज दोन्ही देश लढाईसाठी सज्ज होत आहेत, हे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.