
पाकिस्तानातून हिंदुस्थानात पळून आलेली सीमा हैदर लवकरच तिचा हिंदुस्थानी पती सचिनच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सीमाने युट्युबवर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. सीमाला तिच्या पाकिस्तानीपतीपासून चार मुले असून सचिनकडून एक बाळ अशी पाच मुले आहेत.
पबजी खेळत असताना सीमा हैदर व सचिन ऐकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर सीमाने तिच्या चार मुलांसह मे 2023 मध्ये बेकायदेशीरपणे नेपाळमार्गे हिंदुस्थानात प्रवेश केला होता. ती दोन वर्षांपासून सचिनसोबत नोएडातील राबुपुरा येथे राहत आहे.
सीमाने याआधी 18 मार्च 2025 रोजी एका मुलीला जन्म दिला होता. हे सचिन आणि सीमा यांचे पहिले अपत्य होते. तिने तिचे नाव भारती ठेवले. आणि ती तिच्या मुलीला प्रेमाने मीरा म्हणते.



























































