मॅग्रा, सेहवाग, मांजरेकर, भोगले समालोचनासाठी तयार

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया या मालिकेचे थेट प्रक्षेपण ‘सोनी पिक्चर्स स्पोर्टस् नेटवर्क’ (एसपीएसएन) या वाहिनीद्वारे करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी समालोचनाची टीमही तय्यार करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांसाठी एक अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी एसपीएसएन आपल्या एक्स्ट्रा इनिंग्स या स्टुडिओ शोलाही सुरुवात करत आहे. एक्स्ट्रा इनिंग्समध्ये महान आणि माजी क्रिकेटपटूंचा समावेश असेल. ग्लेन मॅकग्रा, संजय मांजरेकर, अजय जाडेजा, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, निक नाइट, मोहम्मद पैफ, मुरली कार्तिक, विवेक राजदान, अजित आगरकर आणि विजय दहिया हे खेळाडू विविध मालिकांद्वारे आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांच्याकडील माहितीचे भांडार
खुले करतील.

आपली प्रतिक्रिया द्या