सेल्फी आणि खूप काही!!! मोबाईलचा कॅमेरा ओळखणार तुमचा मूड, वाचा

मानवी भावभावनांचा कल्लोळ हे खरंतर न समजणारे गणित आहे. कुणीतरी नैराश्यामुळे आत्महत्या करतो हे आपण वाचतो ऐकतो. परंतु आता तुमचे नैराश्य ओळखण्यासाठी फक्त एका सेल्फीची गरज आहे.. मानवी भावनांचे यथोचित विश्लेषण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी, मोबाईल डिव्हाइसवरील फ्रंट-फेसिंग कॅमेरा वापरणारे एक नवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. सध्या आपल्या आजूबाजूला अनेक तरुण तरुणी इमोबॉट नावाचे अॅप वापरत आहेत. नैराश्यावर उपचार करण्यासाठी सजगता म्हणूनच अनेकजण हे अॅप वापरताना दिसत आहेत. म्हणूनच इमोबाॅट हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

या अॅपच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावरील हावभाव टिपता येतात. तसेच यावरील आपली चालण्याची गती, हृद्याची हालचाल यावरुन इतरही महत्त्वाची आरोग्यपूर्ण माहितीचा मागोवा घेता येतो. इमोबॉटला फ्रान्समध्ये एक वैद्यकीय उपकरण म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच फ्रान्समध्ये मानसोपचारतज्ज्ञांना हे वैद्यकीय उपकरण म्हणून कामाला येत आहे.

हे अॅप बनवणारी टिम सुरुवातीला अतिशय साशंक होती. मूळातच हे अॅप सतत तुमच्यावर लक्ष ठेवते. त्यामुळेच अॅप बनवणारे खूप साशंक होते. याचं पुढचं पाऊल म्हणजे हे अॅप भविष्यात फोन मायक्रोफोनद्वारे दिवसभर काम करताना तुमचा आवाजही ऐकणार आहे. इमोबाॅटचे तंत्रज्ञान ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानासारखे आहे. जेणेकरून ते खरोखर त्यांच्या संगणकावर बसले आहेत की ते थकलेले दिसत आहेत का ते तपासता येईल.

सह-संस्थापक सॅम्युअल लर्मन यांच्या मते, इमोबोटला फ्रान्समध्ये वैद्यकीय उपकरण म्हणून वर्गीकृत केले आहे. आम्ही पॅरिसमधील व्हिवाटेक परिषदेत प्रदर्शित केलेल्या भावना मॅपिंग सॉफ्टवेअरचा वापर केला होता. यावेळी निरीक्षणांती एकाच वेळी रिपोर्टर जेन मिल्स एकाच वेळी आनंदी आणि कंटाळलेले दिसत होते.

व्हिवाटेक 2025 मध्ये मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. यावेळी 50 हून अधिक देशांतील 14,000 हून अधिक स्टार्टअप्स जमले होते. सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळात आता आरोग्यसेवा आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.