
डोंबिवलीतील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण विकास निधी देण्याऐवजी गळचेपी करत असल्याने पक्ष सदस्यत्काचा राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे
विकास म्हात्रे तीन केळा नगरसेवक म्हणून निवडून येत स्थायी समितीचे सभापतीपद, गटनेतेपद अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यादेखील माजी नगरसेविका राहिल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक नेतृत्वाकडून होणारा अन्याय यामुळे म्हात्रे दाम्पत्य नाराज होते. अखेर त्यांनी राजीनामा दिला.