ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद: शतम्’ योजना, 65 वर्षांच्या वरील ज्येष्ठांच्या मोफत चाचण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि उपाययोजनांसाठी ‘शरदः शतम्’ नावाची योजना तयार केली आहे. या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यावर ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

एक ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात या योजनेची माहिती त्यांनी दिली.

विविध आरोग्य तपासण्या मोफत

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. आजाराचे वेळीच निदान व्हावे आणि त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी कराव्यात आणि या तपासण्या मोफत असाव्यात या उद्देशाने ‘शरदः शतम्’ ही योजना खूप महत्त्वाची आहे, असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.