ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नयैर यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kuldip-nayar

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नयैर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दशकांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय होते. त्यांची अनेक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत.

कुलदीप नयैर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात उर्दू पत्रकारितेतून केली होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी दिल्लीच्या ‘द स्टेट्समॅन’चे संपादक पद देखील भूषवले होते. केवळ पत्रकारिताच नाही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांनी जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी लेखनासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

१९९० मध्ये त्यांना ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांची उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नयैर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रासाठी हिंदुस्थानच्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य होते. तर ऑगस्ट १९९७ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती.

कुलदीप नैयर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, द एक्सप्रेस ट्रिब्यून पाकिस्तान, डॉन पाकिस्तान, प्रभासाक्षी यासह ८० वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन देखील केलं होतं.

summary: senior journalist kuldip nayar passed away