ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पिंपळे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहिल्या पिढीतील पालघरमधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि यशस्वी उद्योजक रमेश पिंपळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 96 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे उपनेते उत्तम पिंपळे यांचे ते वडील होत.

रेल्वे पोलीस दलाच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रमेश पिंपळे यांनी शेतीकडे वळत अनेक व्यवसाय उभे केले. भात खरेदी विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. शिवसेनेच्या सुरुवातीच्या विस्ताराच्या काळात त्यांनी खंबीरपणे पक्षवाढीसाठी मोलाची साथ दिली. विशेषतः 1980 च्या दशकात शिवसैनिकांवर विविध कारणांनी गुन्हे दाखल होत असताना त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक ती आर्थिक व कायदेशीर मदत मिळवून देण्यात रमेश पिंपळे यांचा मोलाचा वाटा होता. शिवसैनिकांच्या अडीअडचणीत ते धावून जात. त्यांच्या पार्थिवावर मासवण येथील वैपुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो पदाधिकारी, शिवसैनिकांसह  विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.