
सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका लोकप्रिय आहे. मालिकेत रूपालीला कळतं की, इंद्राणीला नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही. त्यामुळे रूपालीचा संताप होतो. रागावलेल्या रूपालीला शांत करण्यासाठी इंद्राणी तिला त्रिनयना देवीच्या प्रकटदिनाविषयी सांगते. प्रकटदिनादिवशी हळदकुंकू ओलांडलं गेलं तर देवीची अवकृपा होईल आणि त्याचा नेत्राला त्रास होईल, कदाचित नेत्राची दिव्यशक्ती, तिला संकेत दिसणं, हे सगळं कायमचं बंद होईल, असं इंद्राणी रूपालीला सांगते.
त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार आणि नेत्रा हळदीकुंकू ओलांडणार का… हे लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.


























































