
पंजाबी गायकाच्या घरी मोलकरणीने हातसफाई केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे पंजाबी गायकाकडे मॅनेजर म्हणून काम करतात. त्याने 11 मे रोजी घरकामासाठी मोलकरणीला ठेवले होते. ती मोलकरीण दोन तास काम करून त्यानंतर निघून जात असायची. त्याच्या पत्नीला लग्नात भेट म्हणून सोन्याचे दागिने दिले गेले होते. तीन दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने कपाटात दागिने पाहिले होते. मात्र बुधवारी त्याच्या पत्नीला दागिने घालून कार्यालयात जायचे होते तेव्हा त्यांना दागिने कपाटात मिळून आले नाहीत. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



























































