
सामना ऑनलाईन । मुंबई
ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरी करणाऱ्या नोकराला जुहू पोलिसांनी अटक केली. योगीराज अनन पुजारी असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अभिनेत्री जुहू परिसरात राहतात. त्यांच्याकडे दोन नोकर आहेत. तीन वर्षांपासून योगीराज हा त्यांच्याकडे सफाईचे काम करत होता. तक्रारदारांनी सुरक्षेकरिता घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 1 एप्रिलला त्यांनी नोकरांना पगार, अन्य खर्चाकरिता दीड लाख बँकेतून काढले होते. त्यांनी ते पैसे कपाटात ठेवले होते. योगीराजने संधी पाहून कपाटातून दीड लाख रुपये चोरले व चोरलेले पैसे त्याने त्याच्या भावाला दिले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर योगीराज ताब्यात घेण्यात आले.
























































