अबब! भांडूपमध्ये आढळला सात फुटाचा अजगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भांडूपच्या महानगर पालिका वसाहतीत सात फुटांचा अजगर आढळला आहे. या अजगरामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या अजगराला पकडून सुखरुपणे जंगलात सोडण्यात आले आहे.

भांडूपच्या महानगर पालिका वसाहतीतल सार्वजनिक शौचालयात सात फुटाचा अजगर आढळल्याने एकच हाहाकर उडाला. सर्प मित्रांनी वेळीच धाव घेत हा अजगर ताब्यत घेतला आणि त्याला सुखरुप जंगलात सोडले आहे.

आधी बिबट्या आता अजगर

गेल्या वर्षी मुलुंडच्या एका रहिवासी भागात बिबट्या शिरला होता. तर आता नुकतंच अंधेरीतल्या एका मॉलमध्ये बिबट्या शिरला होता. आता भांडूपच्या रहिवासी भागात एक अजगर आढळला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असावे असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.