जर्मनीत युरोपा थीम पार्कमध्ये दुर्घटना…कार्यक्रमादरम्यान व्यासपीठ कोसळले; 7 जण जखमी

थीम पार्क. परदेशातून आपल्याकडेही ही कल्पना बऱ्यापैकी रुजली आणि लोकप्रियही ठरली आहे. परदेशात तर विकेंड पर्यटकांसाठी हे एक मनोरंजनाचे फार मोठे साधन आहे. मोठमोठी थीम पार्क्स आणि तेथे केले जाणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम हा श्रोत्यांच्या दृष्टीने फार मोठा आकर्षणाचा भाग असतो. येथे विविध शोज केले जातात. भयपट.. साहसपट.. यांच्या नावाखाली भन्नाट कल्पना तेथे राबविल्या जातात. वाटेल ते प्रयोग केले जातात. आणि बऱ्याचदा हे तथाकथित साहसी प्रयोग अंगलट येतात.

असाच काहीसा प्रकार जर्मनीतील सर्वात मोठ्या थीम पार्कमध्ये घडला आहे. युरोपा पार्कमध्ये एक समुद्री चाच्यांचा शो सदर केला जात होता. त्यामधील एक साहस दृश्य केले जात असताना प्रेक्षकांसमोरचे उंच व्यासपीठ कोसळल्याने किमान सात जण जखमी झाले आहेत. या अपघातात कलाकार पाण्यात कोसळले. त्यांच्या सभोवतालची संरचना कोसळल्याने ते 25 फूट खाली पाण्यात बुडाले. सातपैकी तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाटकीय दृश्यात मोबाइल पूल क्रॅक होत असल्याचे दाखवले आहे – तेव्हाच हा अपघात घडला. हा अपघात कसा घडला याचा पोलिस आता तपास करत आहेत.

युरोपा पार्क हे जर्मनीमधील सर्वात मोठे आणि फ्रान्समधील डिस्नेलँडनंतर युरोपमधील दुसरे सर्वात लोकप्रिय थीम पार्क आहे. हे जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमा त्रिकोण प्रदेशात स्थित आहे आणि स्ट्रासबर्गच्या दक्षिणेस सुमारे 34 मैल आहे .पार्कच्या तिकिटांची किंमत 40 ते 300 डॉलर्स दरम्यान आहे.