
सामना ऑनलाईन । शिमला
हिमाचल प्रदेश मधील सिरमौर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांसह 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. सदर दुर्घटनेची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
Himachal Pradesh: 7 dead, including 6 children and 11 injured after a bus fell into a gorge in Sirmaur. pic.twitter.com/EOBLh5r7PW
— ANI (@ANI) January 5, 2019
शिमला पसून 150 कि.मी दूर असलेल्या रेणुकाजी मंदिराजवळ ही दुर्घटना झाली. सर्व विद्यार्थी डीएवी शाळेत जात होते. या दुर्घटनेत चालकाचाही मृत्यू झाला व 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्तांना काढतना प्रशासनाला मोठ्या अडचणी येत होत्या. पोलीस म्हणाले की चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबात तपासनंतर नेमके कारण स्पष्ट होईल.

























































