सात वर्षांनंतर सुपर रेड मून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण सोमवारी झाले. हिंदुस्थानातून हे चंद्रग्रहण दिसले नाही. अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि अन्य देशांमध्ये सुमारे 87 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण दिसले. या दशकातील सर्वात दीर्घकाळ असे हे  ग्रहण होते. यावेळी चंद्र लाल दिसला. त्याला सुपर फ्लॉवर मून असेही म्हटले जाते. 1989 नंतर असा योग आला. सुपर फ्लॉवर रेड मूनचा योग आता 26 जून 2029 रोजी येणार आहे. त्यावेळी चंद्रग्रहण सर्वाधिक म्हणजेच 102 मिनिटांचे असेल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांनी चंद्राचे लालबुंद मोहक रूप टिपले आहे.