
व्हॉटस्ऍप, टिकटॉक, बिंगो आदी स्ट्रीमिंग ऍपद्वारे शहरात ऑनलाइन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोघा दलालांच्या गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने गठडय़ा वळल्या. जुहू परिसरात ही कारवाई करीत पोलिसांनी तिघा तरुणींची सुटका केली. या गुन्ह्यातील मुख्य दलाल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जयेश बोहरा ऊर्फ टोनी या नावाचा दलाल त्याचे साथीदार योगेश ऊर्फ युवी अशोक गेहलोत, सूरज मंडल, राजकुमार, रवी मंडल यांच्याशी संगनमत करून व्हॉटस्ऍप, टिकटॉक, बिंगो आदी स्ट्रीमिंग ऍपद्वारे ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत असल्याची खबर समाजसेवा शाखेला मिळाली. याची दखल घेत पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून टोनी व गेहलोत यांच्याशी संपर्क साधून वेश्यागमनासाठी तरुणींची मागणी केली.
त्यानुसार या दलालांनी जुहू येथील झेड लक्झरी रेसिडन्सी या हॉटेलात छापा मारला असता तीन तरुणी पोलिसांच्या हाती लागल्या. त्यानंतर पोलिसांनी युवी गेहलोत आणि सूरज सुरजकुमार मंडल या दोघा दलालांना ताब्यात घेतले.




























































