कोरोनातही हायप्रोफाईल सेक्स रॅकेट जोरात

कोरोना संकटातही हायप्रोफाईल सेक्स रॅकेट जोरात असल्याचे पोलीस कारवायांमुळे उघडकिस आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-12 च्या पथकाने वनराई परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलात कारवाई करीत एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.

बॉलीवूडमध्ये सह कलाकाराची भूमिका करणारी एक वादग्रस्त सह अभिनेत्री बॉलीवूडमध्ये असलेल्या ओळखीचा गैरफायदा उचलत सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती युनीट-12 ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, एपीआय विक्रमसिंह कदम, उपनिरीक्षक हेमंत गिते, तसेच महिला अमंलदार अश्विनी देवळेकर या पथकाने त्या रॅकेटचा शोध घेत सापळा रचून पुढील कारवाई केली. वेश्या व्यवसायासाठी त्या अभिनेत्री साडेदहा लाखाची मागणी केल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या