शाबाश मिठू! मिताली राजवरच्या बायोपिकचा टीझर पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेंटलमन्स गेम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खेळात महिलांचा दबदबा निर्माण करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक म्हणजे मिताली राज. सचिनच्या 6 वेळा वर्ल्डकप खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी करणारी महिला क्रिकेट खेळाडू मिताली राज हिच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 हजारांहून अधिक धावांची नोंद आहे.

3 डिसेंबर 1982 रोजी राजस्थानमध्ये जन्मलेली मिताली राज गेल्या 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत असून अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. अशा या मितालीवर येऊ घातलेल्या शाबाश मिठू या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये तापसी पन्नू ही मिताली राज हिच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.

टीझर सुरू होतो तेव्हा 3 क्रमांकाची जर्सी घातलेली पाठमोरी मिताली अर्थात अभिनेत्री तापसी पन्नू दिसते. त्यानंतर थेट हातात बॅट घेतलेला तापसीचा चेहरा टिझरमध्ये दिसतो. या चित्रपटाचा टीझर मनोरंजक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी करत आहेत. तापसीसोबत या चित्रपटा अभिनेता विजय राजही दिसणार आहे.

पाहा व्हिडीओ –